राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र!

Spread the love

राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र!

यवतमाळमध्ये १४ तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्यभरात सध्या सुरु असलेल्या एटीएसच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशातच विदर्भातील यवतमाळमध्ये पुसद आणि उमरखेडमध्ये १४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसचे छापे पडल्याची माहिती आहे. दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसनं सर्च ऑपरेशन राबवलं आहे. त्या अनुषंगाने अनेक भागात जवळपास २१ ठिकाणी एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहीती आहे. सोबतच या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यात शनिवारी रात्रीपासून अनेक भागात एटीएस ची गोपनीय कारवाई सुरुये. विदर्भातही ४ ते ५ ठिकाणी एटीएस पथकाने कारवाई सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि पुसद गावात एटीएस पथकाची शनिवारी रात्रीपासून कारवाई सुरु आहे. तर अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनअंतर्गत काही भागातही कारवाई सुरू आहे. एटीएसचे २० पथक हे रात्रीपासून उमरखेड आणि पुसद गावात तळ ठोकून आहे. ATS प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करण्यात आले असून राज्यात अनेक ठिकाणी काल रात्रीपासून हे पथके तळ ठोकून आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जवळपास एटीएस २० पथक दाखल आहे. या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह आयपीएस अधिकारी देखील हजर आहे. त्यामुळे या कारवाईत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon