ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत अंधेरीत दोन नाबालिग मुलांना कुटुंबाच्या स्वाधीन

Spread the love

ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत अंधेरीत दोन नाबालिग मुलांना कुटुंबाच्या स्वाधीन

योगेश पांडे / वार्ताहर

अंधेरी : दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत सीनियर डीएससी विशेष पथकाने लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या दोन नाबालिग मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अंधेरी पोस्टवर आणण्यात आले.

सहायक उपनिरीक्षक पहुप सिंह यांनी मुलांच्या आईला अंधेरी पोस्टवर बोलावून घेतले. चौकशीत महिलेने आपले नाव साया राठौर (वय ३५), पती बसंत राठौर, राहणार पंसवाडी झोपडपट्टी, सोनावाला रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई असल्याची माहिती दिली. मुलं घरातून फिरायला निघून गेल्याचे तिने सांगितले.

मुलांची ओळख पुत्र श्रीनिवास राठौर (वय ११) व पुत्री नंदनी राठौर (वय १४) अशी पटली. आवश्यक समज देऊन दोन्ही मुलांना सुरक्षित अवस्थेत त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. ही सुपूर्दगी जीआरपी व स्टेशन मास्टर अंधेरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

सदर कारवाईबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon