श्री गुरु तेग बहादुर साहेबजींच्या ३५० व्या शहीदी वर्षपूर्तीनिमित्त कल्याण येथे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : “हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षपूर्तीनिमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ-३, कल्याण येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत आगामी कार्यक्रम, मिरवणुका व धार्मिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बंदोबस्त, वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन प्रतिसाद यासह सर्व आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
यावेळी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.