४० तासांत घरफोडीचा पर्दाफाश; शांतीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Spread the love

४० तासांत घरफोडीचा पर्दाफाश; शांतीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी : शहरातील गोपाळनगर परिसरात असलेल्या मोबाईल दुकानात झालेल्या घरफोडी चोरीप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाणे यांनी अवघ्या ४० तासांत गुन्हा उघडकीस आणत दोन आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ₹२३.४५ लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, आरोपींकडून चोरीस गेलेले मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तातडीची चौकशी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, शांतीनगर पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon