मुंबई विमानतळावर सोने-चांदीची प्राचीन काळातील नाणी जप्त; सीमा शुल्क विभागाने केली एकाला अटक

Spread the love

मुंबई विमानतळावर सोने-चांदीची प्राचीन काळातील नाणी जप्त; सीमा शुल्क विभागाने केली एकाला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने ईस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन बांगलादेश प्रांतासाठी जारी केलेली सोन्याची नाणी विमानतळावर जप्त केली आहेत. या नाण्यांचे वजन १२.३७ ग्रॅम इतके आहे.

शाह आलम दोन यांच्या नावाने ही नाणी त्यावेळी चलनात आणण्यात आली होती. याचसोबत कुशन राजवटीची सोन्याची ८ ग्रॅम वजनाची तसेच मुगल राजवटीतील अहमदाबाद येथून जारी केलेली चांदीची ११.४४ ग्रॅम वजनाची नाणीदेखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली आहेत. लंडन येथून एक प्रवासी व्हर्जिन अटलांटिकच्या विमानाने मुंबईत आला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या सामानात ही दुर्मीळ नाणी आढळली. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आलेल्या प्रवाशाची चौकशी केली जात आहे. त्याच्या चौकशीतून दुर्मीळ नाण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon