घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
योगेश पांडे / वार्ताहर
अंबरनाथ – अंबरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरातील ईश्वर रेसिडेन्सी या गृह संकुलात दुसऱ्या मजल्यावर एका घरात भीषण आग लागल्याची घटना घडली.या भीषण आगीत घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका घरात फ्रिजमध्ये बॅटरीचा स्फोट झाला आणि त्यातून ही आगीची घटना घडली असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ अंबरनाथ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.या आगीच्या दुर्घटनेत घरातील संसार जळून खाक झाला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आगीच्या घटनेनंतर घरातील सदस्यांनी उरलं सुरलं सामान घराबाहेर काढण्यासाठी कसरत केली,दरम्यान, या आगीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा घरातील फ्रीजच्या अनुषंगाने सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्य वापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.