गाडीचे चार्जिंग बंद करणे विसरले अन् घर, कारसह दुकानाची झाली राखरांगोळी

Spread the love

गाडीचे चार्जिंग बंद करणे विसरले अन् घर, कारसह दुकानाची झाली राखरांगोळी

योगेश पांडे / वार्ताहर

अकलूज – रात्रीच्या सुमारास चार्जिंगला लावलेली दुचाकी बंद करायला विसरले, परिणामी गाडीसह घर आणि दुकानाची राख रांगोळी झाल्याची धक्कादायक घटना अकलूज शहरात घडली आहे.

शहरातील महावीर पथ येथील सुहास गांधी यांचे मशनरी चे दुकान आणि घर आहे.बुधवारी रात्री चार्जिंगला लावलेली दुचाकी इलेक्ट्रिक व्हेईकल बंद करण्यास विसरल्यानंतर अचानक दुचाकी गाडीने पेट घेतला आणि त्यानंतर जवळ असलेली चार चाकी गाडी मशनरी चे दुकान आणि घराला देखील आग लागली.आग लागल्याचे कळताच अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोचले आणि तीन ते चार तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

मात्र, दरम्यानच्या काळात दुचाकी चार चाकी मशनरी चे दुकान आणि घराचा बराचसा भाग जळून खाक झाला होता.या आगीत दुचाकी चार चाकी मशनरी चे दुकान आणि घराचा बराचशा भागाचं मोठं नुकसान झालं असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.या भीषण आगीत कार देखील आगीत भस्मसात झाली आहे.दरम्यान, भीषण आगीमुळे परिसरात मोठ्याप्रमाणात काळ्या धुराचे लोट पसरल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon