मनोज जरांगेंना गोळ्या घालून मारतो, मद्यपीची धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल; धनंजय मुंडेंचंही नाव घेतलं

Spread the love

मनोज जरांगेंना गोळ्या घालून मारतो, मद्यपीची धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल; धनंजय मुंडेंचंही नाव घेतलं

योगेश पांडे / वार्ताहर

बीड – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना गोळ्या घालून मारतो अशी धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सध्या बीडमध्ये व्हायरल होत आहे. दारू प्यायल्यानंतर एकाने जरांगे समर्थकाला फोन करत ही धमकी दिली. त्यामध्ये त्याने धनंजय मुंडे यांचेही नाव घेतल्याचं समोर आलं. ही ऑडिओ क्लिप नेमकी कोणती आहे आणि कुणामध्ये हे संभाषण झालं हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

बीडमध्ये व्हायरल होत असलेल्या एका ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली. एका मद्यपीकडून थेट मनोज जरांगे पाटील यांनाच गोळ्या घालण्याच्या धमक्या देण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार प्राप्त नाही. ऑडिओ हा बीडचा आहे की आणखीन कुठल्या जिल्ह्यातला हेही स्पष्ट होत नाही.

व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये एका मद्यपीने दुसऱ्या व्यक्तीला कॉल केला. त्यामध्ये तो म्हणतोय की, “जरांगे पाटलांना कधी गोळ्या घालायचं हे सांग. मी स्वतः त्या गोळ्या घालतो. त्याची बातमी न्यूजला दे. तुझी जात वेगळी आहे. तुला फक्त त्या जरांगेचा अभिमान आहे. तुला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाही.”

संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये मद्यपीने मनोज जरांगे पाटलांना अश्लील भाषेत शिवीगाळही केल्याचं दिसंतय. तसेच या क्लिपमध्ये धमकी देणाऱ्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केल्याचं दिसून आलं. या ऑडिओमधील संभाषण कुणाचं आहे, ते नेमकं कुठलं आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon