अकोला महापालिकेमध्ये राडा! काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात धमक्या दिल्याचा आरोप; एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या

Spread the love

अकोला महापालिकेमध्ये राडा! काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात धमक्या दिल्याचा आरोप; एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या

योगेश पांडे / वार्ताहर

अकोला – अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवडीनंतर सभागृहात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सभागृहातच राडा केला. एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये एकमेकांसोबत शाब्दिक चकमक झाली आहे. दरम्यान अकोला महापालिका सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर सभागृहातच बांगड्या फेकल्या.

अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाली आहे. भाजपचे शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा ४५ विरुद्ध ३२ मतांनी पराभव केलाय. दरम्यान, एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवक एकमेकांसोबत भिडले. MIM चे ३ नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिल्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांसोबत वाद घातला.

दरम्यान, भाजपच्या महापौरला ३८ नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा १, शिंदेंच्या शिवसेनेचा १, आणि २ अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला होता. दुसरीकडं एमआयएमचे ३ नगरसेवक ऐवेळी तटस्थ राहिले. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा फोल ठरलाय. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या साथीने महापालिकेवरील सत्ता राखली आहे. तर भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय झाल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, अकोला महापालिकेत भाजपाने सत्ता राखली आहे. अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांची निवड झाली आहे. शारदा खेडकर प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा त्यांनी ४५ विरुद्ध ३२ मतांनी पराभव केलाय. भाजपच्या शारदा खेडकर यांना भाजपच्या ३८ नगरसेवकांसह शरद पवारांचे राष्ट्रवादीचे तीन अजित पवारांचे राष्ट्रवादीचा एक शिंदेंच्या शिवसेनेचा एक आणि दोन अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळालाय. काँग्रेसच्या आघाडीत गेलेले भाजपचे बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला. तर एमआयएमचे तीन नगरसेवक ऐनवेळी तटस्थ राहिलेत. महापालिकेत चमत्काराचा काँग्रेसने केलेला दावा फोल ठरलाय. बहुमत मिळालेलं नसतानाही भाजपने मित्र पक्षांच्या साथीने महापालिकेवरील सत्ता राखली आहे. भाजपाच्या कूटनीतीचा अकोला महापालिकेत मोठा विजय झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon