शरीरसुखाची मागणी,आई व मुलाकडून थेट तरुणाची हत्या; अखेर ८ दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या माय-लेकांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – क्राईम पेट्रोल आणि दृश्यम सिनेमात दाखवतात तसाच काहीसा थरार छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात प्रत्यक्षात घडला आहे. शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका तरुणाला आई आणि मुलाने मिळून यमसदनी धाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल ८ दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या माय-लेकांचा छडा अखेर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे लावला आहे.
राजू रामचंद्र पवार राहणार जामडी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर वंदना राजू पवार वय ४५, मुलगा धीरज उर्फ टेमा राजू पवार वय १८ राहणार जामडी फॉरेस्ट तालुका कन्नड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत राजू रामचंद्र पवार हा गावातीलच वंदना पवार हिच्याकडे वारंवार शारीरिक संबंधांची मागणी करत होता. या त्रासाला कंटाळलेल्या वंदनाने आपल्या १८ वर्षांच्या मुलासह, धीरज ऊर्फ टेमा याच्यासोबत मिळून राजूला कायमचे संपवण्याचा कट रचला.
घटनेच्या दिवशी वंदनाने राजूला खुणेने शेतात बोलावले. वासनेने अंध झालेला राजू तिथे पोहोचला. तो शरीरसंबंधासाठी कपडे काढत असतानाच दबा धरून बसलेल्या धिरजने त्याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्याचवेळी आईने त्याचे गुप्तांग दाबून त्याचा श्वास रोखला. अवघ्या काही मिनिटांत राजूला ठार मारल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला दृश्यमचा खेळ.
धिरजने क्राईम पेट्रोल आणि दृश्यम चित्रपट पाहून पोलिसांची दिशाभूल करण्याची पूर्ण तयारी केली होती.गावकरी काहीही बोलण्यास तयार नसल्याने पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी मास्टरस्ट्रोक खेळला. त्यांनी बंजारा भाषा बोलणारे गुप्तहेर आणि महिलांना साध्या वेशात गावात पाठवले. ‘आपलाच माणूस’ समजून वंदनाने काही गुपिते ओकली आणि पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच या माय-लेकांनी आपला गुन्हा कबूल केला.