भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय

Spread the love

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय

योगेश पांडे / वार्ताहर

नवी दिल्ली – भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर नितीन नवीन यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाकडून १६ जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला होता, त्यानुसार सोमवारी अर्ज नामांकनप्राप्त आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नबीन ३७ सेटसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी त्यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते. या निवडीसाठी भाजपचे जवळपास सर्व मुख्यमंत्री, राज्य युनिट प्रमुख आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपने१४ डिसेंबर २०२५ रोजी नितीन यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. आता, तेच राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.

भाजपा संगठन पर्व अनुसार भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ.के.लक्ष्मण यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसाठी अर्ज आणि निवडणूक प्रक्रिया संवैधानिक आणि पारदर्शी पद्धतीने पूर्ण झालीय. ३६ पैकी ३० राज्यात झालेल्या संघटनात्मक निवडणुकीनंतर अर्ज आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. देशभरातून आलेल्या विश्वास आणि समर्थनाच्या जोरावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नबीन यांची निवड झाल्याचं के. लक्ष्मण यांनी जाहीर केलं.

गेल्या सहा महिन्यांत तीन राज्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बिनविरोध निवडले गेले आहेत. जुलैमध्ये, हेमंत खंडेलवाल यांची मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर, डिसेंबरमध्ये, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि सात वेळा लोकसभा खासदार राहिलेले पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. जानेवारीमध्ये, आदित्य साहू यांची झारखंडमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महाराष्ट्रातील नेते आणि मंत्री नितीन गडकरी यांनीही कामकाज पाहिले आहे. नितीन गडकरी हे २००९ ते २०१३ या कालावधीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर,२०१३ ते २०१४ या कालावधीत राजनाथसिंह यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राजनाथसिंह यांच्यानंतर २०१४ ते २०२० या कालावधीत अमित शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर, २०२० पासून जेपी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. दोन्ही नेत्यांच्या कार्यकाळात भाजपने मोठी आणि लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. तसेच, देशात सत्ता कायम राखण्यातही त्यांना यश मिळालं. आता, भाजपने नव्या आणि तरुण चेहऱ्याकडे देशाच्या भाजपची धुरा दिली आहे. त्यानुसार, भाजपच्या आज झालेल्या निवड प्रक्रियेतून नितिन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon