निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूर हादरलं!

Spread the love

निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूर हादरलं!

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आधी कोयत्याचे सपासप वार, मग दगडाने ठेचून तरूणाची हत्या

योगेश पांडे / वार्ताहर

सोलापूर – सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाला आठवडी बाजारात गाठून त्याच्यावर पहिल्यांदा कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले, त्यानंतर दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण वसंत वाघमारे असे या तरुणाचे नाव आहे. आणि वळसंग परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,लक्ष्मण वसंत वाघमारे हा तरूण व्यवसायाने ड्रायव्हर होता. नेहमीप्रमाणे तो वळसंग येथील सिद्धेश्वर चौकातील आठवडी बाजारासाठी निघाला होता. यावेळी आरोपीने लक्ष्मणचा रस्ता अडवला आणि त्याला काही कळून चुकण्याआधीच आरोपीने कोयता काढून त्याच्यावर सपासप वार करायला सूरूवात झाली. या हल्ल्यात लक्ष्मण गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर आरोपीने बाजूलाच असलेला भलामोठा दगड उचलून त्याची दगडाने ठेचून हत्या केली होती. ३१ डिसेंबर २०२५ च्या संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेने परिसर हादरलं होतं.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या हत्येचा तपास करत एका आरोपीला अटक केली होती. रविकुमार भीमाशंकर पुटके असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीने लक्ष्मण वाघमारे याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान लक्ष्मण वाघमारे याचे नेमके कुणासोबत अनैतिक संबंध होते, याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही आहे. पोलिस या घटनेचा अधित तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon