अंधेरीत मनसेला मोठं खिंडार! विधानसभा विभाग अध्यक्षाचा पक्षाला राम राम; शिवसेना शिंदे गटात प्रवेश
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही घडामोडींना वेग आला आहे. अंधेरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी मनसेला राम राम करत हातात शिवसेना शिंदेचा गटाचा झेंडा घेतला आहे.
आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोहन सावंत यांनी आपल्या समर्थकांसोबत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे. एन महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटात रोहन सावंत पक्ष प्रवेश केल्यामुळे अंधेरीत मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे मधून रोहन सावंत प्रभाग ७५ मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र, महापालिका निवडणुकीमध्येच रोहन सावंत यांनी अंधेरीत मनसे मध्ये मोठे खिंडार पाडून मनसेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या सर्वानीं ठाण्यात शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. रोहन सावंत यांच्या पक्ष प्रवेश केल्यामुळं अंधेरीत मनसेची ताकत कमी झाली आहे. त्यासोबत कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी नाराजी पसरली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळं मुंबईत त्यांची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे. अशातच भाजपने देखील शिवसेनेबरोबर युती केली आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिका निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अशातच मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश होताना दिसत आहेत. हा विरोधी पक्षाला मोठा धक्का माना जात आहे.