ओडिशा/आंध्रप्रदेशातून गांजाची तस्करी; इन्नोव्हा कारमधून ६३८ किलो अंमली पदार्थ जप्त

Spread the love

ओडिशा/आंध्रप्रदेशातून गांजाची तस्करी; इन्नोव्हा कारमधून ६३८ किलो अंमली पदार्थ जप्त

ठाणे : मालमत्ता कक्ष, गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत इन्नोव्हा कारमधून तब्बल ६३८ किलो गांजा जप्त केला आहे. या अंमली पदार्थाची किंमत रु. २ कोटी ०४ लाख १६ हजार इतकी असून रु. १० लाख किमतीची कारसह एकूण रु. २ कोटी १४ लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोना/जयकर जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ३० डिसेंबर २०२५ रोजी सायं. ६.१५ वाजता खारेगाव टोल नाका परिसरात सापळा रचण्यात आला. AP-09-BF-9382 या इन्नोव्हा कारमधून ओडिशा व आंध्रप्रदेशातून गांजाची तस्करी करणारा चिन्ना टागुर लक्ष्मण नायक (३६, रा. गाजुलाय तांडा, मेहबुबनगर, तेलंगणा) याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
सदर आरोपीला कोर्टाने ३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास मालमत्ता कक्षाकडून सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये वपोनि. गोरखनाथ घार्गे, पोउनि. संजय भिसे, मपोउनि. शितल पाटील, सपोउनि. शिवाजी गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

अंमली पदार्थ विरोधातील कारवाईत ठाणे गुन्हे शाखेने मिळवलेल्या या यशामुळे पोलिसांच्या दक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon