पनवेलमध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर शस्त्र जप्त; एकाला अटक

पनवेल : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका व्यक्तीकडून अवैध पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे लावलेल्या सापळ्यात आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने आपले नाव अनंथ अधिमुलम पाडायची (वय ३६, रा. सानपाडा, नवी मुंबई) असे सांगितले. त्याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. ७८०/२०२५ महाराष्ट्र शस्त्र अधिनियम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१)(३)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार यांच्या गोपनीय माहितीनुसार करण्यात आली. या कारवाईत एपीआय सुनील वाघ, पीएसआय किरण राउत, पोलीस हवालदार प्रवीण पवार, पोलीस नाईक भोसले, पोलीस शिपाई काकडे, कराड आणि कधिनाथ लोखंडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगणाऱ्या संशयितांवर पोलिसांनी कारवाई अधिक कठोर केली असून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.