पनवेल महापालिकेत निवडणुकीपूर्वीच निकाल स्पष्ट; भाजपचे नितीन पाटील बिनविरोध विजयी

पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निवडणूकपूर्वच यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून भाजप उमेदवार नितीन पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद ठरल्यानंतर पाटील हे एकमेव उमेदवार रिंगणात उरले होते. अखेर निवडणूक निर्णय अधिकृतपणे जाहीर करण्यात आला असून निवडणुकीचा औपचारिक निकाल लागू पडला आहे.
पाटील यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या निवडीमुळे पनवेल महापालिकेत भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
निवडीनंतर पाटील यांनी प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि सुविधा वाढवणे हेच पुढील काळातील मुख्य ध्येय राहील, असे त्यांनी नमूद केले.