पेणमध्ये भरदिवसा महिलेचा विनयभंग; दोन जणांविरोधात गुन्हा

Spread the love

पेणमध्ये भरदिवसा महिलेचा विनयभंग; दोन जणांविरोधात गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

रायगड : पेण शहरात भरदिवसा महिलेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पेण पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरात तीव्र संतापाची लाट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी क्रमांक ०१ याने फिर्यादी महिलेस उद्देशून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतरो आरोपी क्रमांक ०२ याने महिला फिर्यादीस अंगाला स्पर्श करून विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या कृत्यामुळे फिर्यादी मानसिकदृष्ट्या व्यथित झाल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर पीडित महिलेनं धैर्य दाखवत थेट पेण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीवरुन पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २९७/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७९, ११५(२), ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon