मिरा-भाईंदरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत उमेदवाराचा मृत्यू

Spread the love

मिरा-भाईंदरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत उमेदवाराचा मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर

मिरा-भाईंदर – मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर पडल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एका उमेदवाराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जावेद पठाण (६६) असे मृत उमेदवाराचे नाव आहे. या घटनेवर शहरवासीयांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिरा रोड च्या नया नगर भागातील निवडणूक कार्यालयात पठाण मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग क्रमांक २२ मधून अर्ज दाखल करण्यास त्यांच्या समर्थकांसह दाखल गेले होते. येथे काही वेळाने अर्ज दाखल करून पठाण बाहेर पडले. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले. तर, भाजपच्या पदाधिकारी वनिता बने यांना तिकीट नाकारल्यानंतर प्रकृती बिघडून हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. शहरात १५ जानेवारीला मतदान होणार आहे. १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon