धारावी प्रभाग १८५ : भाजप उमेदवार रवी राजा यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : धारावी प्रभाग क्रमांक १८५ मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रवी राजा यांनी मंगळवारी दादर (प.) येथील डी’सिल्वा शाळेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी सुमारे ११.५० वाजता शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी घरून वाजतगाजत शाळेकडे प्रस्थान केले. मार्गभर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
अर्ज दाखल करताना भाजप महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष प्रसाद लाड, विभाग प्रमुख, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शांत व शिस्तबद्ध वातावरणात प्रक्रिया पार पडल्याचे सांगण्यात आले.
यानंतर स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना रवी राजा म्हणाले, “धारावी प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवणे आणि विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे. जनतेचा विश्वास आमच्या पाठीशी आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमानंतर धारावीतील राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीत प्रभागातील स्पर्धा चुरशीची होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.