शिवडीत एकामागून एक ४ सिलेंडरचे स्फोट; चाळीला आग, धुरांचे लोट, मात्र जीवितहानी नाही

Spread the love

शिवडीत एकामागून एक ४ सिलेंडरचे स्फोट; चाळीला आग, धुरांचे लोट, मात्र जीवितहानी नाही

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईत महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षाची लगबग सूरू असताना तिकडे वडाळ्यातील शिवडीमध्ये सिलेंडरचे एकामागून एक ४ स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत ही स्फोटाची घटना घडली. ही घटना इतकी भयानक होती चाळीतील ५-६ घरे जळुन खाक झाले.या घटनेत जिवितहानी झाल्याची अद्याप तरी कोणतीही माहिता समोर आली नाही आहे. पण या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता घटना घडली. या घटनेत सूरूवातीला एका चाळीतील घरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. ही आग पुढे पुढे पसरत गेली आणि एका घरात असलेल्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.त्यानंतर आजूबाजूच्या घरात असलेल्या ३ सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.एकूण ४ सिलिंडरच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलासोबतच शिवडी पोलीस, पालिकेचा वॉर्ड स्टाफ आणि बेस्टचे कर्मचारीही तातडीने मदतीसाठी पोहोचले तसेच या घटनेनंतर बरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला.सुदैवाने या भीषण स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon