रिकीज बार व किचनचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू !

Spread the love

रिकीज बार व किचनचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू !

एका वर्षात ५ ब्रिच केसेस, तरीही मोकाट

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : हिरानंदानी इस्टेट परिसरातील ‘रिकीज बार अँड किचन’ (एफ.एल.-III परवाना क्र. २५३९) या बारमध्ये नियमभंग, अनधिकृत रचना, परवाना क्षेत्राबाहेर मद्यविक्री, सार्वजनिक रस्त्यावर खुर्च्या-टेबल्स, तसेच अल्पवयीन मद्यप्राशनाच्या तक्रारींसह गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी मोठ्या ताकदीने पुढे आली आहे. दैनिक पोलीस महानगर चे कार्यकारी संपादक प्रकाश संकपाळ यांनी सादर केलेल्या सविस्तर अर्जानंतर आता प्रशासनही हलले असून सदर प्रक्रियेला गती मिळाल्याची माहिती मिळत आहे.

🔴 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट; तात्काळ अहवाल मागविण्याचे निर्देश

दैनिक पोलीस महानगर ची टीम यांनी ठाणे अप्पर जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण कागदपत्रे व पुरावे सादर केले असून यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, ठाणे यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. त्यामुळे परवाना रद्द करण्याची प्रक्रिया वेगात सुरू झाली आहे.

🔴 बेकायदेशीर काउंटर, बंद बाटल्यांची विक्री – नियमांचा चक्काचूर

राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागीय निरीक्षक यांच्या तपासणीत बारमध्ये अनधिकृत तीन दारू काउंटर, त्यातील एका काउंटरवरून सीलबंद बाटल्यांची थेट विक्री, मंजूर नकाशा न सादरीकरण, विना परवानगी रचनात्मक बदल, परवाना क्षेत्राबाहेर सेवा असे प्रकार नोंदले गेले आहेत. याशिवाय रहिवासी इमारतीतील पोटमाळ्यावर बेकायदेशीर मद्य साठा, स्वयंपाकघरालगत साठवण केली असून आगीचा धोका निर्माण होऊ शकतो, पदपथांवर टेबल-खुर्च्या, रात्री गोंधळ, अल्पवयीन मद्य सेवनाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या आहेत.

🔴 एक वर्षात ५ ब्रिच केसेस – तरीही धंदा धडाक्यात?

गेल्या १२ महिन्यांत ५ ब्रिच केस नोंद असूनही नियमभंग सुरूच. त्यामुळे आता नागरिक व पत्रकार संघटना ‘कायदा सर्वांसाठी समान’ असल्याची मागणी जोरदार करत आहेत.

🔴 “परवाना तात्काळ रद्द व्हावा” – पोलीस महानगरचा ठाम आग्रह

“प्रशासनाने पुराव्यानिशी सादर केलेल्या सर्व बाबी गांभीर्याने घेऊन बारचा एफ.एल.-III परवाना रद्द करावा आणि संबंधितांवर फौजदारी कारवाई व्हावी”अशी मागणी दैनिक पोलीस महानगरच्या टीम ने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon