ठाण्यात सायबर गुन्हे व महिला सुरक्षा जनजागृती मोहीम; पोलिस व ईगल ब्रिगेडची संयुक्त पुढाकार
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालय झोन–५, कापूरबावडी पोलीस स्टेशन व ईगल ब्रिगेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हे प्रतिबंध आणि महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना सायबर फसवणूक, ऑनलाईन धोके तसेच महिला सुरक्षेचे उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मोहीमेदरम्यान उपस्थित तज्ञांनी अनओळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी/बँक माहिती कोणालाही न देणे, सोशल मीडिया सुरक्षितता, महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन्स यावर सविस्तर माहिती दिली. तसेच तात्काळ मदतीसाठी पोलीस व नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहनही करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली असून महिला सुरक्षा व सायबर प्रतिबंधक उपायांचे ज्ञान पोहोचवण्यास ही मोहीम उपयुक्त ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.