मनपा प्रभाग १५१ मध्ये काँग्रेसकडून माजी नगरसेविका वंदनाताई साबळे चर्चेत

Spread the love

मनपा प्रभाग १५१ मध्ये काँग्रेसकडून माजी नगरसेविका वंदनाताई साबळे चर्चेत

सामाजिक कार्याची भक्कम पायाभरणी; स्थानिकांतून समर्थनाची चर्चा

रवि निषाद / मुंबई

मुंबई : मुंबई काँग्रेस पक्षाच्या सचिव व माजी नगरसेविका वंदनाताई गौतम साबळे मनपा प्रभाग क्रमांक १५१ (ठक्कर बाप्पा कॉलनी–सहकार नगर) मधून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. प्रभागात साबळे दाम्पत्याची गेल्या दहा वर्षांची राजकीय व सामाजिक कामाची नोंद असून, दिवंगत नगरसेवक गौतम साबळे आणि त्यांच्या पश्चात वंदनाताई साबळे यांनी या क्षेत्रात प्रतिनिधित्व केले आहे.

कोविड काळात आरोग्यसंकटाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी केलेल्या सेवा उपक्रमांमुळे साबळे दाम्पत्याची छाप स्थानिक पातळीवर अधिक मजबूत झाल्याचे मानले जाते. तसेच धार्मिक यात्रांचे आयोजन, स्थानिक समस्यांवर पाठपुरावा, सामाजिक कार्यक्रमात सातत्याने सहभाग यामुळे त्यांचा जनसंपर्क दृढ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दिवंगत गौतम साबळे यांच्या निधनानंतरही वंदनाताई साबळे विविध सामाजिक, सेवा आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहिल्या आहेत. प्रभाग १५१ हा अनुसूचित जाती महिला राखीव मतदारसंघ असल्याने काँग्रेसकडून त्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांत त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्याचा उल्लेखही पक्षांतर्गत चर्चेत असल्याचे सांगितले जाते.

मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना प्रभाग १५१ मध्ये काँग्रेसची पुढील रणनीती, अधिकृत उमेदवारी जाहीर होणे आणि आगामी निवडणूक समीकरणे कशी राहतील, याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon