भ्रष्टाचाराविरोधी लढ्यास आणखी बळ; रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नवी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू
सुधाकर नाडार / मुंबई
अलिबाग : सरकारी कामकाजातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचारविरोधी यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवीन सार्वजनिक व्हॉट्सॲप हेल्पलाईन 8087821064 कार्यान्वित केली आहे. नागरिकांना कोणत्याही भ्रष्ट आचरणाची माहिती किंवा तक्रार सहज आणि तात्काळ नोंदवता यावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या हेल्पलाईनचे उद्घाटन अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड युनिटच्या पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे आणि पोलीस निरीक्षक नारायण सरोदे उपस्थित होते.
नवीन व्हॉट्सॲप हेल्पलाईनच्या माध्यमातून शासकीय कार्यालयात लाच मागितली गेली, कंत्राटी कामात अनियमितता आढळली किंवा भ्रष्टाचाराचा संशय असल्यास नागरिकांना थेट संदेश, दस्तऐवज किंवा पुरावे पाठवून तक्रार नोंदवता येईल. भ्रष्टाचाराविरोधी लढा केवळ यंत्रणेचाच नाही, तर प्रत्येक जागरूक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, भ्रष्ट व्यवहार तात्काळ कळवून प्रामाणिक व पारदर्शक प्रशासनासाठी सहकार्य करावे.
महत्त्वाचे संपर्क:
🔹 टोल फ्री : 1064
🔹 व्हॉट्सॲप हेल्पलाईन : 8087821064
🔹 ऑनलाईन तक्रार नोंद : acbmaharashtra.net
🔹 ई-मेल : [email protected]
ACB रायगड, अलिबाग कार्यालय:
📞 02141-222331
📱 डीवायएसपी – सरिता भोसले : 9004374910
📱 पोलीस निरीक्षक – निशांत धनवडे : 8108355488
📱 पोलीस निरीक्षक – नारायण सरोदे : 7977116231
📧 ई-मेल : [email protected]
या उपक्रमामुळे भ्रष्टाचाराविरोधी तक्रारींना अधिक वेगवान प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.