वाशीतील ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ क्लबवर अल्पवयीनांना प्रवेश, दारू-हुक्का पुरवठ्याचे आरोप; हाणामारीनंतरही पार्ट्या सुरूच

Spread the love

वाशीतील ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ क्लबवर अल्पवयीनांना प्रवेश, दारू-हुक्का पुरवठ्याचे आरोप; हाणामारीनंतरही पार्ट्या सुरूच

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : वाशीतील सायबर वन, सेक्टर ३०ए येथील ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ या क्लबमध्ये काही दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणांमध्ये झालेल्या हाणामारीचा कथित प्रकार समोर आल्याची चर्चा रंगत आहे. या प्रकरणानंतरही क्लबमध्ये ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांची जाहिरात सुरू असल्याने नाईटलाइफच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच अल्पवयीनांना दारू आणि हुक्का पुरवठा होत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी सोशल मीडियाद्वारे जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वादानंतरही क्लबमध्ये २४ आणि २५ डिसेंबरला विशेष कार्यक्रम, लाइव्ह म्युझिक व डान्स नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. अल्पवयीनांना मद्य किंवा हुक्का पुरवणे हा कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा मानला जातो. अशा परिस्थितीतही क्लबचे संचालन पूर्ववत सुरू असल्याने पालक व स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या संदर्भात क्लब व्यवस्थापनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र, “अल्पवयीन युवांची उपस्थिती, अवैध पदार्थांचा पुरवठा आणि गोंधळाच्या घटना जर सत्य असतील, तर संबंधित परवान्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे काही नागरिकांचे मत आहे. पोलिसांकडूनही तपासाची मागणी वाढत असून, नवी मुंबई पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईतील वाढत्या नाइटलाइफ संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर ही घटना इतर बार-लाउंजसाठीही इशारा म्हणून पाहिली जात आहे. कायद्याचे पालन, सुरक्षाव्यवस्था आणि अल्पवयीनांच्या प्रवेशावर नियंत्रण याबाबत गंभीर पावले उचलण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon