नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तळोजा एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा; १ अल्पवयीनसह ६ महिलांची सुटका

Spread the love

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तळोजा एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा; १ अल्पवयीनसह ६ महिलांची सुटका

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळोजा एमआयडीसी परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय उधळला. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक अल्पवयीन बांग्लादेशी पीडित मुलीसह सहा महिलांची सुटका केलीय. अनैतिक मानवी वाहतूक करणाऱ्या रॅकेटविरोधात मोठी कारवाई करण्यात आलीय.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना वेश्या व्यवसायाबाबत माहिती मिळाली होती. माहितीनुसार २१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.५८ वाजता हॉटेल नवनाथ इन लॉजिंगवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत अल्पवयीन मुलीसह सहा महिलांची सुटका केली गेलीय. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय तसेच तळोजा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

लॉज मॅनेजर ग्राहकांकडून दोन हजार रुपये घेऊन महिलांना रूममध्ये दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती समोर आली होती. माहितीची खात्री करण्यासाठी लॉजवर बनावट ग्राहक पाठवण्यात आला. सांकेतिक इशारा मिळताच पोलीस पथकाने लॉजवर छापा टाकला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लॉज चालक, मॅनेजर आणि सर्व्हिस बॉयचा समावेश आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी रोखरक्कम, डीव्हीआर, मोबाइल फोन, नोंद वही (रजिस्टर) सह अन्य गोष्टी जप्त केल्या आहेत. या कारवाईत अल्पवयीन पीडितेची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात आलीय. सुटका केलेल्या महिलांची आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि संरक्षणात्मक मदतीसाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा अधिक तपास तळोजा एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon