धुळ्यात बनावट दारु निर्मितीचे रॅकेट उद्ध्वस्त;;३७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
धुळे – आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट दारु निर्मितीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल ३७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक टक देखील करण्यात आली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने शिवारात ‘अग्रो टेक्नर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या नावाखाली एका पत्र्याच्या शेडमध्ये हा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. या आधारे पथकाने छापा टाकला असता, तिथे बनावट देशी-विदेशी मद्य, ब्लेंड आणि निर्मिती साहित्य आढळून आले. या कारवाईत एका चारचाकी वाहनासह तब्बल ३७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, प्रफुल्ल भोई या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली असून, नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.