निवडणुकीच्या तोंडावर आरपीआय च्या जिल्हा सचिवांवर जीवघेणा हल्ला; आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट

Spread the love

निवडणुकीच्या तोंडावर आरपीआय च्या जिल्हा सचिवांवर जीवघेणा हल्ला; आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – नवी मुंबई आरपीआयचे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यात दिलपाक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, गुन्हेगारी घटनांमध्येही लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे नवी मुंबई जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर भरदिवसा कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली असून आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईचे आरपीआयचे जिल्हा सचिव बुद्धप्रकाश दिलपाक यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. आंबेडकरी समाजाकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात कोणाचा सहभाग होता आणि त्यांचा आका कोण आहे? याचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.राजकीय वैमनस्यातून ही घटना घडली का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचं समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon