कुर्ल्यात एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी मोठी कारवाई; ५.१६ लाखांचा मेफेड्रॉन जप्त, एकास अटक

Spread the love

कुर्ल्यात एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी मोठी कारवाई; ५.१६ लाखांचा मेफेड्रॉन जप्त, एकास अटक

मुंबई : कुर्ला परिसरात अंमली पदार्थ विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत ५ लाख १६ हजार ८०० रुपयांच्या मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्जसह एका इसमाला अटक केली आहे. ही कारवाई कुर्ला पोलिस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (९ डिसेंबर) पहाटे केली.

कुर्ला पोलिस ठाण्यात गु.र.क्र. ८२२/२०२५ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) सह २२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मो. फारुख अब्दुल सत्तार सरवैय्या (वय ५०) असे असून तो माहीम (प) येथील दाना गल्ली परिसरातील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर रोजी पहाटे ६.४० वाजताच्या सुमारास गुजराती हॉलच्या बाजूच्या गल्लीत, लायन्स गार्डन, एल.बी.एस. रोड, कुर्ला (प) येथे संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमावर लक्ष ठेवण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार दोन पंचांच्या साक्षीने आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे ५१.६८ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन ड्रग्ज आढळून आला. याची अंदाजे किंमत ५,१६,८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर अंमली पदार्थ विक्री व व्यापाराच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बाळगल्याप्रकरणी आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपाळ, पोलीस शिपाई जायकर, वावरे, लहामगे, कुऱ्हाडे आदींचा समावेश होता.

या प्रकरणाचा अधिक तपास कुर्ला पोलिस ठाण्याचे पथक करीत असून, आरोपीकडे हा अमली पदार्थ कुठून आला आणि यामागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास म्हामुनकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon