मनमाड शहरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ६४ वर्षीय आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – मालेगाव पाठोपाठ आत मनमाड शहर चिमुरकल्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने हादरले आहे. मनमाड शहरात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६४ वर्षीय व्यक्तीला अटक करून गुन्हा केला दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मनमाडमध्ये झालेल्या अत्याचाराच्याघटनेन् शहर हादरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६४ वर्षीय बाबा भागवत या आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका ७ वर्षीय मुलावर अत्याचार केला शिवाय त्याची शहरातील एका भागात असलेली लॉन्ड्रीच्या दुकानात प्रेस करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डिवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितले.
आरोपी बाबाचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. या दुकानात जी लहान मुले कपडे घेऊन येत असे त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे, त्यांना जवळ घेणे,अनैसर्गिक पद्धतीचे चाळे करत असे. हे प्रकरण समोर आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ नराधमाला अटक केली असून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
तसेच घडलेल्या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. तसेच नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरता पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.