ड्रग्स तस्कर सुरजकुमार प्रजापती पीआयटी-एनडीपीएस अंतर्गत कोठडीत; १ वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

Spread the love

ड्रग्स तस्कर सुरजकुमार प्रजापती पीआयटी-एनडीपीएस अंतर्गत कोठडीत; १ वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : कादिवली अंमली पदार्थ विरोधी कक्षाने गांजा तस्करीत सक्रिय असलेल्या सुरजकुमार रामविलास प्रजापती (वय २९) याच्यावर पीआयटी-एनडीपीएस
कायद्यान्वये कडक कारवाई करत त्याला १ वर्षासाठी कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

सुरजकुमारवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत एकूण सात गुन्हे दाखल असून, यापैकी एका गंभीर प्रकरणात तो सध्या जामिनावर बाहेर होता. मात्र, जामिनावर मुक्त झाल्यानंतरही तो पुन्हा अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता.

हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मंजूर केल्यानंतर पीआयटी-एनडीपीएस कायदा १९८८ अंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी सुरजकुमार प्रजापती याला ताब्यात घेऊन कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.

सुरजकुमार प्रजापतीवर नोंद असलेले गुन्हे :

मालाड पोलीस ठाणे — गु.र.क्र. ५२/२०२०

मालाड पोलीस ठाणे — गु.र.क्र. २०९/२०२१

मालाड पोलीस ठाणे — गु.र.क्र. ४५१/२०२२

गोरेगाव पोलीस ठाणे — गु.र.क्र. २६०/२०२३

मालाड पोलीस ठाणे — गु.र.क्र. १२४/२०२५

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली — गु.र.क्र. ४१/२०२४

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली — गु.र.क्र. ५८/२०२५

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उप आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) नवनाथ ढवळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या देखरेखीखाली पार पडली.

या ऑपरेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल शेळके व गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या पथकाने विशेष कामगिरी बजावली. ड्रग्स तस्करीविरोधातील या कठोर कारवाईमुळे अमली पदार्थांच्या साखळीला मोठा धक्का बसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon