जालना जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश

Spread the love

जालना जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश

पोलिस–आरोग्य विभागाची संयुक्त कारवाई; दोन अटक, आठ जणांवर गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

जालना – जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी मिळून केलेल्या संयुक्त कारवाईत हा धक्कादायक प्रकार समोर आला. गावातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गुप्तरित्या गर्भलिंग परीक्षणाचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर तातडीने पथक तयार करण्यात आले.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकताना पथकाने दोन मुख्य आरोपी – केशव गावंडे आणि सतीश सोनवणे – यांना अटक केली. यापैकी एक आरोपी पॅथॉलॉजिस्ट असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. छाप्यातून पेनाच्या आकाराचे गर्भलिंग निदान करणारे यंत्र जप्त करण्यात आले असून हे उपकरण मोबाईल ऍपच्या माध्यमातून ऑपरेट केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाईदरम्यान त्या ठिकाणी तीन पुरुष आणि तीन महिला देखील उपस्थित आढळल्या. दोन मुख्य आरोपींसह एकूण आठ जणांवर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शेडमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच ही कारवाई राबवली.

जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवाया वाढत असल्याने आरोग्य विभाग आणि पोलिसांनी पुढील तपास अधिक कडक पद्धतीने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon