हाजी अरफात शेख यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; राज्यभरातून मान्यवर आणि समर्थकांची कुर्ल्यात गर्दी
रवि निषाद / मुंबई

मुंबई – भाजपाचे दमदार नेते, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा वाहतूक सेलचे प्रमुख हाजी अरफात शेख यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्ला (पश्चिम) येथील त्यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधी, समाजसेवक आणि हजारों समर्थकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्त त्यांच्या समर्थकांनी राज्यभरात सामाजिक आणि जनउपयोगी उपक्रम राबवून वाढदिवसाचे औचित्य साधले. रक्तदान शिबिरे, अन्नदान, गरजूंसाठी साहित्य वाटप असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आले.
कुर्ला येथील त्यांच्या निवासस्थानीही मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडले. ख्वाजा पीर यांच्या समर्थकांनी जंगी कव्वालीचे आयोजन केले होते, ज्याला मोठ्या संख्येने भाविक आणि समर्थकांनी उपस्थिती लावली. हाजी, मान्यवर मौलवी, व्यापारी, वाहतूकदार आणि विविध क्षेत्रातील नामवंत मंडळीही या कार्यक्रमाला हजर होती.
श्री. हाजी अरफात शेख यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत समर्थक आणि शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. वाढदिवसानिमित्त झालेल्या या भव्य उपस्थिती आणि उत्साहाने परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते.