कापूरवाडी पोलिसांची ‘नशामुक्त भारत’ जनजागृती रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – नशामुक्त समाजाची दिशा ठरवण्यासाठी कापूरवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. “नशा मुक्त समाज – सुरक्षित भविष्य” हा मुख्य संदेश देण्यात आलेल्या या रॅलीला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
रॅलीदरम्यान “नशा करणार नाही, करू देणार नाही” हा निर्धार व्यक्त करत नशाविरोधी जनजागृतीचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात आले. पोलिसांनी व्यसनाच्या दुष्परिणामांची माहिती देत सामाजिक सहभागाचे आवाहन केले.
या उपक्रमात २५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. नशाप्रवृत्तीला प्रतिबंध आणि जागरूकता वाढवण्यासाठी कापूरवाडी पोलिसांचा हा उपक्रम प्रशंसनीय ठरला.