भरदिवसा चंदननगरमध्ये १५ लाखांची लूट फसली; तरुणाच्या धैर्यामुळे चोरटे पसार

Spread the love

भरदिवसा चंदननगरमध्ये १५ लाखांची लूट फसली; तरुणाच्या धैर्यामुळे चोरटे पसार

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : शहरातील चंदननगर परिसरात भरदिवसा घडलेल्या थरारक घटनेने खळबळ उडाली. वडगाव शेरी येथील २३ वर्षीय तरुणाने दाखवलेल्या अफाट धैर्यामुळे तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा डाव उधळून लागला.

दुपारी सुमारे दोनच्या सुमारास हा तरुण ॲक्टिव्हावरून बॅगेत रोख रक्कम घेऊन हनुमान मंदिर–गणेशनगर–ऑक्सिजन पार्क परिसरातून जात असताना दोन ॲक्टिव्हावरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्याला अडवले आणि ठोशाबुक्क्यांनी मारहाण करत बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

मात्र, घाबरून न जाता तरुणाने जोरदार प्रतिकार केला. त्याने आरडाओरडा करताच आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. जमाव वाढत असल्याचे लक्षात येताच चोरटे रिकाम्या हाताने पळ काढण्यात यशस्वी ठरले.

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon