सीएसएमटी बस स्टॉपजवळ संशयित बॅग आढळल्यानं खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दिल्लीमध्ये सोमवारी मोठा स्फोट झाला, या स्फोटामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले, या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. पोलीस अजूनही अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान त्यानंतर आता मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुंबईच्या सीएसएमटी बस स्टॉपजवळ शुक्रवारी एक लाल रंगाची संशयित बँग आढळून आली आहे. या रस्त्यावर नेहमी गर्दी असते, त्यामुळे या ठिकाणी संशयित बँग आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली, दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसोबतच आरपीएफ आणि जीआरपीचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं. या बँगमध्ये नेमकं काय आहे, याचा शोध बॉम्बशोधक पथकाकडून घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या सीएसएमटी बस स्टॉपजवळ शुक्रवारी एक लाल रंगाची संशयित बँग आढळून आली आहे. या रस्त्यावर नेहमी गर्दी असते, संशयित बँग आढल्यानं एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, आरपीएफ आणि जीआरपीचं पथक घटनास्थळी दाखल झालं. बॉम्बशोधक पथकाकडून या बँगेमध्ये नेमकं काय आहे, याचा शोध घेण्यात आला, खबरदारी म्हणून यावेळी संपूर्ण बस डेपो रिकामा करण्यात आला होता.
बॉम्बशोधक पथकाकडून या बँगेची तपासणी करण्यात आली. या बँगमध्ये नेमकं काय आहे? काही घातपाताचा तर कट नाहीना? या बॅगेला इथे नेमकं कोण सोडून गेलं असे अनेक प्रश्न सुरुवातीला होते, दरम्यान त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून या बॅगेची तपासणी करण्यात आली, तपासणीदरम्यान या लाल रंगाच्या बँगमध्ये कपडे आणि काही वस्तू आढळून आल्या आहेत, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र ही बॅग नेमकी कोणाची आहे, हे अद्याप समोर आलेलं नाहीये, पोलिसांकडून या बॅगेचा पंचनामा करण्यात आला आहे, दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.