बालकांमध्ये सुरक्षिततेची जाणीव आणि व्यसनमुक्तीचा संदेश!
कळवा पोलीस स्टेशन व कॉज फाउंडेशनतर्फे भाविका विद्यालयात जनजागृती कार्यक्रम
पोलीस महानगर नेटवर्क
कळवा (ठाणे) | कळवा पोलीस स्टेशन आणि कॉज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाविका विद्यालय, खारेगाव येथे विद्यार्थ्यांसाठी “सुरक्षा जनजागृती व व्यसनमुक्ती” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘गुड टच – बॅड टच’, व्यक्तिगत सुरक्षिततेसाठी घ्यावयाच्या दक्षता, तसेच विविध प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाद्वारे बालकांमध्ये स्वसंरक्षण, जबाबदारीची जाणीव आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश पोहोचविण्यात आला.
शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गाने कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजात बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.