मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई! देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त; शिताफीने आरोपीला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंब्रा : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी आणखी एक धडक कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एका आरोपीला शिताफीने अटक केली आहे. कायद्याचा धाक राखत पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहे.
सदर कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून अवैधरित्या बाळगलेले शस्त्र जप्त केले असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे परिसरात कायद्याचा धाक पुन्हा अधोरेखित झाला आहे.