वंदे मातरम् गीताच्या १५०व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात सामुदायिक गायनाचा कार्यक्रम
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – वंदे मातरम् या राष्ट्रीय गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात सामुदायिक वंदे मातरम् गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे वंदे मातरम् चे सामूहिक गायन करून राष्ट्रगीताला अभिवादन केले.