मानवतेचा हात; ठाणे पोलिसांची तत्पर व संवेदनशील कामगिरी
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे शहरातील कोपरी ब्रिज सर्कल परिसरात वाहतूक नियमन करत असताना कोपरी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, हेड कॉन्स्टेबल पवार, हेड कॉन्स्टेबल शिरोडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल काकडे यांना नागरिकांकडून रेल्वे ट्रॅकवर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत पडलेली असल्याची माहिती मिळाली.
प्रसंगावधान राखून आणि वेळेचे महत्त्व ओळखत, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला रेल्वे ट्रॅकवरून सुरक्षित स्थळी हलवले. त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था केली.
ठाणे पोलिसांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी कार्याची नागरिकांकडून सर्वत्र प्रशंसा होत आहे.
हाच खरा पोलीस खात्याचा चेहरा, तत्परता, जबाबदारी आणि मानवता!