गुन्हे शाखेची जलद कारवाई! २४ तासांत ऑटोचालकाला अटक

Spread the love

गुन्हे शाखेची जलद कारवाई! २४ तासांत ऑटोचालकाला अटक

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : महिला प्रवाशाची बॅग आणि सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या ऑटो-रिक्षा चालकाला ठाणे गुन्हे शाखा युनिट-३च्या अधिकाऱ्यांनी केवळ २४ तासांत अटक केली आहे.

चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि वापरात असलेली ऑटो-रिक्षा जप्त करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

गुन्हे शाखेच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे पीडितेला न्याय मिळाला असून ठाणे पोलिसांच्या दक्षतेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon