देशभर ‘दक्षता जनजागृती सप्ताह-२०२५’ साजरा होणार; नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – केंद्रीय दक्षता आयोगामार्फत २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह-२०२५’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. या आठवड्यात सरकारी कामकाजात पारदर्शकता, जबाबदारी आणि प्रामाणिकतेचे मूल्य दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.
कोणताही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई येथे त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी खालील माध्यमे उपलब्ध आहेत –
📞 दूरध्वनी क्रमांक : 24921212
☎️ टोल फ्री क्रमांक : 1064
📱 व्हॉट्सअॅप क्रमांक : 8828241064
📧 ईमेल : [email protected]
नागरिकांसह सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे अपर पोलीस आयुक्त (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप दिवाण यांनी आवाहन केले आहे.