खिशात पैसा नाही, बँकेचं कर्ज डोक्यावर; ऐन दिवाळीत शेतकऱ्याने संपवलं आयुष्य
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील खादगाव येथे सततची नापिकीला कंटाळून एका साठ वर्षीय शेतकऱ्यांनी शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे, रामनाथ विश्वनाथ तानवडे वय ६० वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या अगोदर देखील तालुक्यातीलच एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पैठण तालुक्यातील ही दुसरी आत्महत्या आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठं नुकसान झाला आहे, शेतातील तूर मूग सोयाबीन हे पिके खराब झाले आहेत, उर्वरित कपाशीमध्ये दिवाळी साजरी करता येईल अशी आशा होती. मात्र दिवाळीच्या दिवशीच पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतातील पिके ही खराब झाले आहे. कपाशीच्या वाती वळल्या गेल्या आहेत, तसेच बँकेतून घेतलेले कर्ज फेडायचे कसे अशा विवंचनेत यंदा पडले होते.
शासकीय बँकेचे ५० हजार रुपये पीक कर्जही होतं, काही हात उचले ही पैसे होते त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून व नापिकेला कंटाळून पहाटे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.