“सेवा, सुरक्षा आणि शौर्य!” पोलीस स्मृती दिनानिमित्त भोईवाडा पोलीस ठाण्यात शस्त्र प्रदर्शन; प्रशिक्षणार्थ्यांना शस्त्रांची माहिती
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – पोलीस दलातील शूर शहीदांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस स्मृती दिन मोठ्या आदराने साजरा करण्यात आला. या निमित्ताने भोईवाडा पोलीस ठाण्यात विशेष शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध प्रकारची शस्त्रे, त्यांचा वापर, सुरक्षित हाताळणी आणि तांत्रिक माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली. पोलीस अधिकारी व जवानांनी स्वतः प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करून प्रशिक्षणार्थ्यांना शस्त्रांचे महत्त्व आणि त्यामागील जबाबदारी समजावून सांगितली.
शस्त्र प्रदर्शनादरम्यान शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या कार्याची उजळणी करण्यात आली. “सेवा, सुरक्षा आणि शौर्य” या ब्रीदवाक्याशी सुसंगत अशा या कार्यक्रमातून पोलिस दलाची शिस्त, तत्परता आणि देशसेवेची भावना अधोरेखित झाली.
या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये पोलिस दलाबद्दल आदर आणि प्रेरणा दोन्ही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.