“गुलाब, पेन आणि गोड संदेश!”; ठाणे पूर्व वाहतूक पोलिसांचा दिवाळीतील आगळावेगळा उपक्रम
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – दिवाळीच्या सणात नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुरक्षिततेचा संदेश फुलवण्यासाठी ठाणे पूर्व वाहतूक विभागाने एक आगळावेगळा उपक्रम राबवला. वाहतूक पोलिसांनी सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना गुलाबाचे फूल, पेन आणि मिठाई देत “वाहतूक नियम पाळा, सुरक्षित राहा!” असा संदेश दिला.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस-जनता मैत्रीचा धागा आणखी दृढ झाल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक पोलिसांच्या या संवेदनशील आणि सकारात्मक प्रयत्नाचे नागरिकांनी कौतुक केले.
दिवाळीच्या शुभसंध्येला वाहतूक सुरक्षेचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ आनंददायी नव्हे, तर समाजाला जागरूक करणारा ठरला आहे.