मुंबईत २.३० किलो सोन्याची जबरी चोरी करणारे आरोपीत १००% मुददेमालासह अटक! 

Spread the love

मुंबईत २.३० किलो सोन्याची जबरी चोरी करणारे आरोपीत १००% मुददेमालासह अटक! 

सुधाकर नाडार / मुंबई 

मुंबई – रफी अहमद किडवाई मार्ग पोलीसांनी भानाराम भगराज रबारी (वय २१) आणि लिलाराम देवासी (वय २१) यांना २,०६७.१४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करत अटक केली आहे. चोरीची एकूण किंमत ₹२,२९,४०,७०५ इतकी आहे. घटना १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० ते २.५० वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी श्री. शामलाभाई होथीभाई रबारी (वय ३१) यांची कंपनी मास्टरचैन अँड ज्वेलर्स कडून हॉलमार्क आणि क्वालिटी अस्साय एलएलपी कडे सोन्याचे दागिने घेऊन फॅक्टरीकडे जात असताना, आर.ए.के. चार रोड, झकेरिया बंदर रोड, शिवडी येथे त्यांच्यावर मागून येणाऱ्या आरोपींनी धक्का देऊन थांबवले. मागील मोटारसायकलवरील इसमाने पिस्टल घालून फिर्यादीच्या काळ्या रंगाच्या बॅगेतील सोन्याचे दागिने बळजबरीनं घेऊन पळून गेले.

तपासादरम्यान परिमंडळ ४ येथील अधिकारी व अंमलदारांनी आठ टीम तयार करून घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी गुजरात येथून अटक करण्यात आली. अटक दरम्यान आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे २,०६७.१४३ ग्रॅम वजनाचे दागिने व चोरीत वापरलेले मोबाईल जप्त करण्यात आले.

रफी अहमद किडवाई पोलीसांची ही कारवाई शहरात दागिन्यांची चोरी रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण यशस्वी टप्पा आहे.

ही यशस्वी कारवाई श्री देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री सत्यनारायण चौधरी, पोलीस सह-आयुक्त (गुन्हे व सुरक्षा), बृहन्मुंबई, श्री विक्रम देशमाने, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, श्रीमती रागसुधा आर., पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, मुंबई, आणि मा. सहा. पोलीस आयुक्त, माटुंगा विभाग, श्री सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासाची प्रत्यक्ष कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनोद तावडे, रा.अ. कि. मार्ग पोलीस ठाणे यांनी केली, तसेच तपासात मदत करणारे अधिकारी होते: पोलीस नाईक संजय परदेशी, गुन्हा दाखल अधिकारी पो.उ.नि. समाधान कदम, सपोनि गोविंद खैरे, सपोनि महेश मोहीते, सपोनि शिवाजी मदने, सपोनि प्रदिप पाटील, पोउपनिः अमित कदम, किरण नवले, माधवेंद्र येवले, सुनिल पाटील, किरण भोसले

सपोनि खाडे, पोउपनिः खरात, पोउपनिः प्रविण पाटील, एटीसी अधिकारी: सपोनि शेवाळे, सपोनि गणेश होळकर, पोउपनिः अविनाश ढेरे, पोहवा गोविंद ठोके तसेच इतर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी यामध्ये सहभाग घेतला आणि ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon