मुंबईत ‘हुंडा’बळी, २०२५ मधील आकडा जाणून मोठा संताप; जानेवारी ते जुलै दरम्यान छळाच्या ३१४तक्रारी, ९ महिलेंचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईसारख्या शहरात आणि देशाच्या आर्थिक राजधानीतही अनेक घरांमध्ये हुंड्यासाठी महिलांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ केला जातो. धक्कादायक गोष्ट म्हणजे, २०२५ मधील आकडे देखील समोर आले आहेत. ज्यामुळे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहे. चालू वर्षात जानेवारी ते जुलै २०२५ दरम्यान छळाच्या ३१४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर हुंड्यामुळे ९ महिलेचा मृत्यू झाला आहे. यात हुंड्यामुळे ४ तर ५ महिलांनी सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून स्वतःला संपवलं आहे. ३१४ या दाखल झालेल्या तक्रारी आहेत, पण ज्या तक्रारी दाखल झाल्याच नाहीत, त्यांची संख्या किती असेल?
मुंबई शहरातील ही संख्या असल्यामुळे ही मोठी खंत आहे असं म्हणायला हरकत नाही… चारित्र्यावर संशय, मंगळदोष आणि ‘विचित्र शरीरसंबंधा’साठी जबरदस्ती अशी अनेक प्रकरणं उघड झाली आहेत. धक्कादायक म्हणजे, व्यवसायासाठी ६ कोटी रुपये आणण्यास सांगितल्याने महिलेला माहिममध्ये अमानुष मारहाण केली. तर गर्भपात करण्यासाठी देखील महिलांची मारहाण करण्यात आली. अनेक प्रकरणांत सासरचे लोकही हुंड्याच्या मागणीसाठी मुलाला पाठिंबा देत असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
२०२३ आणि २०२४ मधील चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. २०२३ मध्ये ७६६, तर २०२४ मध्ये ४५८ हुंड्यासाठी छळाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर २०२५ मध्ये जुलैपर्यंत ३१४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे समाजातील एक धक्कादायक वास्तव आहे.