डॉ.सुनीता चव्हाण यांच्या “वारी निसर्गरंगांची” या प्रवासवर्णनास शब्दवेल गद्य लेखन गौरव पुरस्कार.
रवि निषाद/मुंबई
विदर्भातील संतभूमी शेगाव येथे ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये डॉ सुनिता चव्हाण यांच्या वारी निसर्गरंगांची या प्रवासवर्णनास स्व.समीर चौधरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा हा पुरस्कार त्यांच्या मातोश्री आदरणीय जयश्री चौधरी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक आदरणीय अध्यक्ष ॲड.धनराज वंजारी आणि माजी शिक्षणमंत्री सन्माननीय वसंतराव पुरके तसेच शब्दवेल साहित्य संघाचे सर्वेसर्वा साहित्यिक प्रवीण बोपुलकर आणि ज्येष्ठ साहित्यिका सन्माननीय प्रतिभा सराफ आणि इतर मान्यवरांसमोर प्रदान करण्यात आला.येथील आध्यात्मिक वातावरणामुळे या पुरस्काराला जणू ईश्वराचे वरदान लाभले आहे,अशीच मनोभावना होती. साहित्य संमेलन अतिशय दिमाखदार आणि वैचारिक मेजवानीचे होते.डॉ.सुनिता चव्हाण या मुंबई येथे गोराई, बोरिवली येथे वास्तव्यास आहेत.त्या वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध आहेत.त्यांच्या एकूण सहा साहित्यकृती प्रकाशित झाल्या असून त्या सर्वांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.त्यातील ‘भयातील निर्भयाकडे.संवाद सेतू’ या आरोग्य विषयक कथासंग्रहाच्या दोन वर्षात नऊ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.प्रत्येकाने वाचावे आणि प्रत्येकाच्या घरी असावे असा हा कथासंग्रह आहे.