‘बाबा’ चैतन्यानांद सरस्वतीला अटक; १७ महिलांची छेडछाड, ४० कोटी रुपयांची फसवणूक उघडकीस
पोलीस महानगर नेटवर्क
नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी ‘बाबा’ चैतन्यानांद सरस्वतीला अटक केली आहे. त्याच्यावर १७ महिलांची छेडछाड आणि तब्बल ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. तपासात त्याच्याकडून दोन बनावट पासपोर्ट, बनावट व्हिजिटिंग कार्ड्स आणि बँक खात्यांचा गैरवापर समोर आला आहे.
बाबा स्वतःला संयुक्त राष्ट्रसंघाचा स्थायी राजदूत, ब्रिक्स जॉइंट कमिशन सदस्य आणि भारताचा विशेष दूत म्हणून ओळखून लोकांना फसवत होता. याशिवाय, त्याने पंतप्रधान कार्यालयाच्या नावाचा गैरवापर करून आपली प्रतिष्ठा वाढवली.
तपासात खुलासा झाला की त्याने १९९८ मध्ये शारदा पीठ मठाची मालमत्ता भाड्याने देण्याच्या कागदपत्रांच्या माध्यमातून ४० कोटी रुपयांची फसवणूक केली. पळून जाण्याच्या काळात तो वृंदावन, आग्रा व मथुरेत लपला आणि १३ हॉटेल्स बदलले. दिल्ली पोलीस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, कोर्टात फसवणूक व महिलांविरुद्ध छेडछाडीचे आरोप सादर केले जातील.