सांगली जिल्हा पोलीस दलातील अधिकारी-अंमलदारांचा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते सत्कार
पोलीस महानगर नेटवर्क
सांगली : सांगली जिल्हा पोलीस दलातील विविध अधिकारी व अंमलदार यांनी कर्तव्य बजावताना दाखविलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. सुनील फुलारी यांच्या हस्ते या अधिकारी-अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आपल्या मनोगतात श्री. फुलारी यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक केले. गुन्हे उकलण्यात दाखविलेली दक्षता, नागरिकाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकारी व अंमलदार करत असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
प्रशस्तीपत्र वितरणाचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या गौरवामुळे पोलिस दलातील इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळून अधिक जोमाने व प्रामाणिकपणे कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.